Join us

मराठी अभिनेत्रीने फॉलो केला Ghibli ट्रेंड, पण फोटो पाहून आली डोक्यावर हात मारण्याची वेळ

By कोमल खांबे | Updated: April 1, 2025 11:15 IST

एका मराठी अभिनेत्रीनेही Ghibli ट्रेंड फॉलो केला. पण, फोटो पाहून तिच्यावर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली.

सध्या सोशल मीडियावर Ghibli ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे. जिकडेतिकडे सर्वत्र फक्त Ghibli फोटो पाहायला मिळत आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही Ghibli फोटो बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. राजकीय नेते, क्रिकेटर्सपासून ते अगदी कलाकारांनीही त्यांचे Ghibli फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका मराठी अभिनेत्रीनेही Ghibli ट्रेंड फॉलो केला. पण, फोटो पाहून तिच्यावर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. 

Chat gptच्या Ghibli स्टाइल फोटोंमुळे सोशल मीडियवर नवा ट्रेंड सुरू झाला. सोशल मीडियावरील इतर ट्रेंड फॉलो करणाऱ्या अभिनेत्री सानिका बनारसवाले हिनेदेखील Ghibli ट्रेंड फॉलो केला. सानिका तिच्या लग्नातील पतीसोबतचा फोटो Ghibli इमेज बनवण्यासाठी निवडला होता. मात्र chat gptने त्याचा वेगळाच Ghibli  फोटो बनवून दिला. जिथे फोटोत सानिका आणि तिचा नवरा अशा दोनच व्यक्ती होत्या. तिथे Ghibli फोटोमध्ये त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसली. अभिनेत्रीने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, सानिका ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. 'स्वामिनी' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. या मालिकेत तिने जानकीबाई पेशवे ही भूमिका साकारली होती. तिने 'कस्तुरी', 'स्वाभिमान' या मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत नैना ही भूमिका साकारत आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी