Join us

Video: 'मला पिरतीच्या झुल्यात झुलवा'; लोकप्रिय लावणीवर संजनाच्या दिलखेचक अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 16:47 IST

Rupali bhosle: व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये संजना अर्थात रुपाली भोसले लावणी सादर करतांना दिसत आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारुन खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले (rupali bhosle). या मालिकेत रुपालीने संजना ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे नकारात्मक भूमिका साकारुनही ती लोकप्रिय झाली. तिच्या याच लोकप्रियतेमुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यातच रुपालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रुपालीने ठसकेबाज लावणी सादर केल्याचं पाहायला मिळत आहे. 

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संजना अर्थात रुपाली भोसले लावणी सादर करतांना दिसत आहे. 'मला पिरतीच्या झुल्यात झुलवा', या एव्हरग्रीन गाण्यावर तिने लावणी सादर केली आहे. विशेष म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि उत्तम नृत्यकौशल्या यामुळे ती प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

संजना-अरुंधतीला विसरा! अनिरुद्धच्या रिअल लाइफ पत्नीला एकदा पाहाच

दरम्यान, ''संजनाच्या दिलखेचक अदांनी रंगणार नवीन वर्षाची पार्टी...'Star प्रवाह धुमधडाका २०२२' . रविवार २ जानेवारी संध्या. ७:०० वा," असं कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करतांना दिलं आहे. त्यामुळे येत्या २ जानेवारी रोजी छोट्या पडद्यावर धुमधडाका 2022  हा कार्यक्रम रंगणार असल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :रुपाली भोसलेसेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन