Join us

शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 16:55 IST

शर्वरी जोग 'कुन्या राजाची तू गं रानी' मालिकेत मुख्य भूमिकेत होती. आता ती 'तू ही रे माझा मितवा' मध्ये दिसणार आहे. तिचा रिअल लाईफ 'मितवा'ही अभिनेताच आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नवी मालिका सुरु होत आहे. 'तू ही रे माझा मितवा' असं मालिकेटं टायटल आहे. यामध्ये अभिनेत्री शर्वरी जोग (Sharvari Jog) आणि अभिनेता अभिजीत आमकर (Abhijeet Amkar) मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांची फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. शर्वरी जोग 'कुन्या राजाची तू गं रानी' मालिकेत मुख्य भूमिकेत होती. त्यामुळे तिचे आधीपासूनच अनेक चाहते आहेत. पण तुम्हाला माहितीये का शर्वरी जोगचा  खऱ्या आयुष्यातला 'मितवा' कोण आहे?

शर्वरी जोग आतापर्यंत अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'जीव झाला येडापिसा' मालिकेतही ती होती. तर कुन्या राजाची तू गं रानी' मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली. तिच्या अभिनयाचे अनेक जण चाहते आहेत. त्यामुळे तिच्या आगामी मालिकेसाठी चाहते उत्सुक आहेत. तर तिच्यासोबत झळकणारा अभिनेता अभिजीत आमकरने याआधी 'एक सांगायचंय' 'टकाटक' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता 'तू ही रे माझा मितवा' मध्ये शर्वरी आणि अभिजीतची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. 

दरम्यान शर्वरी जोग खऱ्या आयुष्यात कोणाला डेट करतेय हे समोर आले आहे. शर्वरीचा बॉयफ्रेंडही अभिनेताच आहे. त्याचं नाव आहे गौरव मालकणकर (Gaurav Malankar). 'पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली. 'फुलपाखरु' मालिकेतून तो घराघरात पोहोचला होता.  शिवाय त्याने 'फुलराणी', 'धर्मवीर २' या सिनेमांमध्येही काम केले आहे. 

शर्वरी आणि गौरव गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. तसंच त्यांनी सोशल मीडियावर या नात्याची कबूलीही दिली आहे. दोघंही अनेकदा एकमेकांसोबत फोटो अपलोड करत असतात आणि एकमेकांवरचं प्रेमही व्यक्त करतात. 

टॅग्स :मराठी अभिनेतास्टार प्रवाहरिलेशनशिपटेलिव्हिजनसेलिब्रिटी