Join us

दृष्ट ना लागो! नाटक संपल्यावर प्रेक्षक महिलेने साडीच्या पदरानेच काढली अभिनेत्रीची नजर, गोड व्हिडिओ पाहून तुमचे डोळेही पाणावतील

By कोमल खांबे | Updated: February 20, 2025 12:01 IST

किती गोड! नाटक संपल्यावर प्रेक्षक महिलेने काढली अभिनेत्रीची नजर, शिल्पा तुळसकरने शेअर केला व्हिडिओ

आपल्या आवडत्या कलाकारांप्रती चाहते नेहमीच त्यांचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. कलाकार भेटल्यानंतर प्रत्येत जण त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरील आपलं प्रेम दाखवतात. अशाच एका अभिनेत्रीची तिच्या चाहतीने थेट नजरच काढली. ही अभिनेत्री म्हणजे शिल्पा तुळसकर. 

शिल्पा तुळसकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच काही हिंदी प्रोजेक्टमध्येही तिने काम केलं आहे. शिल्पाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना नवीन प्रोजेक्टबाबत अपडेट्स देत असते. नुकतंच तिने एका चाहतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये महिला प्रेक्षक साडीच्या पदराने तिची नजर काढताना दिसत आहेत. त्यानंतर शिल्पा त्या महिलेला मिठी मारताना दिसत आहे. 

शिल्पा सध्या मी vs मी या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर एक प्रेक्षक महिला तिच्या भेटीला आली. आणि तिने थेट अभिनेत्रीची नजरच काढायला सुरुवात केली. महिला प्रेक्षकाचं हे प्रेम पाहून शिल्पालादेखील गहिरवरुन आलं. "यासाठीच केला अट्टाहास! मायबाप प्रेक्षकांचे प्रेम हीच खरी माय, आणि तिची माया – प्रयोग संपल्यानंतर मिळणाऱ्या अशा प्रतिक्रिया आणि अनुभव आयुष्यभर मनावर कोरले जातील", असं म्हणत शिल्पाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी