Join us

"९ वर्षांचं प्रेम अन्...", लग्नाला १ वर्ष पूर्ण होताच मराठी अभिनेत्रीची नवऱ्यासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:01 IST

गेल्या वर्षीच शिवानीने अभिनेता अजिंक्य ननावरेसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.

शिवानी सुर्वे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. देवयानी या मालिकेमुळे शिवानी प्रसिद्धीझोतात आली. शिवानीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. गेल्या वर्षीच शिवानीने अभिनेता अजिंक्य ननावरेसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. 

शिवानीने अजिंक्यसोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत समुद्रकिनारी ते दोघे दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत शिवानीने पोस्ट लिहिली आहे. "९ वर्षांचं प्रेम आणि लग्नाला एक वर्ष पूर्ण...हा प्रवास खूप सुंदर होता. आम्हाला जसं हवं होतं अगदी तसंच शांत आणि एकांतात आम्ही लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. गेल्या १० वर्षांत तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हे माझ्यासाठी एक गिफ्ट आहे. तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी आभारी आहे", असं शिवानीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, सध्या शिवानी 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिने 'तू जिवाला गुंतवावे', 'जाना ना दिल से दूर' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर 'वाळवी', 'झिम्मा २', 'जिलेबी' या सिनेमात ती झळकली आहे. तर अजिंक्यच्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. 

टॅग्स :शिवानी सुर्वेटिव्ही कलाकार