Join us

शाहरुख खानच्या गाण्यावर श्वेताचे जबरदस्त एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 14:33 IST

Shweta kharat: श्वेताने 'फिर भी दिल हैं हिंदुस्तानी' या सिनेमातील गाण्यावर रील शेअर केलं आहे.

मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात (shweta kharat). उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. श्वेता सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. यात नुकताच तिने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिच्या एक्स्प्रेशन्सची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगलीये.

श्वेता सोशल मीडियावर सक्रीय असून नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओमध्ये तिने 'फिर भी दिल हैं हिंदुस्तानी' या सिनेमातील  'तुम आए तो हवाओं में रंग सा हैं...' या गाजलेल्या गाण्यावर रील शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये तिने कमालीचे एक्स्प्रेशन्स दिले आहेत.

दरम्यान, श्वेता कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. 'मन झालं बाजिंद' या मालिकेतून तिने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवली. यापूर्वी तिने 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत काम केलं आहे. सध्या ती 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत दिसून येत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकारबॉलिवूडशाहरुख खान