Join us

दोन्ही लग्नं मोडली अन् आता पुन्हा डेटवर, 'या' मराठी अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 17:37 IST

वयाच्या १९ व्या वर्षीच केलं होतं पहिलं लग्न. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेली ही अभिनेत्री

मराठी अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) मध्यंतरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. स्नेहाचा २ वेळा घटस्फोट झाल्याने तिचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेचा विषय ठरलं आहे. दरम्यान स्नेहाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून ती डेटवर असल्याचं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. आता ती नेमकी कोणासोबत डेटवर गेली असा प्रश्न चाहत्यांना पडला असणार.

स्नेहाने इन्स्टाग्रावर निसर्गरम्य ठिकाणी फिरतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. याखाली तिने एक स्पेशल कॅप्शन दिले आहे.'सुख आणि मन:शांतीच्या शोधात मी स्वत:बरोबरच डेटवर आले आहे', असं तिने लिहिलं आहे. हे ठिकाण नेमकं कोणतं ते स्नेहाने दिलेलं नाही मात्र हे फोटोंवरुन हे थंड हवेचं ठिकाण दिसतंय. तिच्या पोस्टवरुन हे कळतंय की ती सध्या एकटीच आयुष्याचा आनंद घेत आहे.चाहत्यांनी कमेंट करत हे नेमकं कोणतं ठिकाण आहे याचा अंदाज घेतला आहे.   

स्नेहा खूप कमी वयाची असताना म्हणजे १९ व्या वर्षी लग्नबंधनात अडकली होती. अविष्कार दार्वेकरसह तिने लग्न केले. मात्र ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडली. यानंतर तिने 2015 साली अनुराग सोळंकी सोबत दुसरे लग्न केले. अनराग इंटिरियर डिझायनर आहे. मात्र हे लग्नही केवळ आठ महिनेच टिकलं. सध्या दोघेही वेगवेगळे राहत आहेत. 

टॅग्स :स्रेहा वाघमराठी अभिनेतासोशल मीडियालग्न