'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'रमा राघव' मालिकेतील अश्विनी म्हणजेच अभिनेत्री सोनल पवार नुकतेच लग्नबंधनात अडकली. नोव्हेंबर महिन्यात सोनलने समीर पालुष्टेबरोबर साखरपुडा उरकला होता. तेव्हापासून सोनल आणि समीरची लव्हस्टोरी नेमकी सुरु कशी झाली होती. हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. नुकतेच लोकमत फिल्मीशी बोलताना सोनलने याचा खुलासा केला.
लग्नानंतर सोनलची ही पहिली मकर संक्रात होती. यावेळी सोनल आणि समीरने लोकमत फिल्मीशी खास गप्पा मारल्या. यावेळी त्यांची लव्हस्टोरी आणि सोनलच्या वडिलांनी लग्नासाठी केलेल्या एका अॅग्रिमेंटचा किस्सा सांगितला.
सोनाली म्हणाली, 'माझ शिक्षण फार्मसी झालं आहे. तेव्हा मला अनेक स्थळ यायची. यात ते मला क्षेत्र बदललं असे प्रश्न मुलाकडची मंडळी विचारत असतं. मग मी सांगायचे की इकडे जास्त संधी आहे. तर त्यांची अशी इच्छा होती की मी फिल्म इंडस्ट्री सोडावी आणि फार्मसीमध्ये नोकरी करावी. मग माझ्या वडिलांनी आमची मुलगी लग्न झाल्यावरही फिल्म इंडस्ट्री सोडणार नाही असं एक अॅग्रिमेंट तयार करुन घेतलं होतं'.
लव्हस्टोरी सांगताना समीर म्हणाला, 'आमच्या दोघांनाही लग्नसाठी स्थळ येत होती. आम्ही एकमेंकाचे सल्ले घ्यायचो. मग एकदा मी तिलाचं मुलाविषयी तिच्या अपेक्षा विचारल्या होत्या. ती मला सांगायची की माझ्या बाबांनी असा एक अॅग्रिमेंट केला आहे. तर मी तिला म्हणालो तुझ्या वडिलांना कोणताही ड्राफ्ट घेऊन येऊदे. मी जे काही असेल त्यावर सही करायला तयार आहे'. तर सोनल आणि समीरच्या संक्रांत स्पेशल लूकवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.
सोनलने 'बॉस माझी लाडाची' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर समीर हा बिझनेसमन आहे. स्पार्कल्स मीडियाचा समीर फाऊंडर आणि सीईओ आहे. याशिवाय समीर डिजीटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणुनही काम करतो. विशेष म्हणजे समीरला भारत सरकारच्या निवडणुक आयोगाकडून पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.