असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या पर्सनल आयुष्यातही बरेच सक्रिय असतात. काही अभिनेत्री घर सांभाळत त्यांचं करिअर करतात. आपल्या पर्सनल आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करायला कलाकारांनाही आवडतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा कलाकार फोटो आणि व्हिडिओही शेअर करतात.
सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या व्हिडिओची चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्वत:च्या हाताने पुरणपोळ्या बनवताना दिसत आहे. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉस मराठी फेम सोनाली पाटील आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन पुरणपोळ्या बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. नैवेद्यासाठी सोनाली या पुरणपोळ्या बनवत आहे. अभिनेत्री आत्मलिंग जत्रेसाठी तिच्या मामाच्या गावाला गेली आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.
सोनालीने काही मालिकांमध्ये काम केलं आहे. 'हर हर महादेव' या सिनेमातही ती दिसली होती. 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सोनाली सहभागी झाली होती. बिग बॉस मराठीमुळे ती चर्चेतही आली होती.