Join us

सुप्रिया पाठारेंच्या नवऱ्याला पाहिलंय का? अभिनेत्रीने पहिल्यांदाच दाखवला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 1:21 PM

सुप्रिया पाठारेंनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच त्यांच्या पतीसोबतचा फोटो शेअर केलाय. या फोटोला त्यांच्या चाहत्यांनी पसंती दिलीय (supriya pathare)

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. सुप्रिया यांनी आजवर अनेक मालिका, सिनेमे, नाटकांंमधून अभिनय क्षेत्र गाजवलंय. सुप्रिया यांचे असंख्य फॅन फोलोईंग आहेत. गेली अनेक वर्ष विविध भूमिका साकारुन सुप्रिया यांनी लोकांच्या मनावर राज्य केलंय. सुप्रिया यांनी एका नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांच्या पतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. याशिवाय एक भावुक पोस्ट सुद्धा लिहिलीय. 

सुप्रिया यांनी पहिल्यांदाच शेअर केला पतीचा फोटो

सुप्रिया यांनी पतीचा एक फोटो शेअर केलाय. यात सुप्रिया आणि त्यांचे पती यांचा सुंदर फोटो पाहायला मिळतो. सुप्रिया यांनी दागिने परिधान केले असून त्या हिरव्या रंगाच्या साडीत दिसत आहेत. तर त्यांचे पती सुटाबुटात दिसत आहेत. हा फोटो शेअर करत सुप्रिया लिहितात, "लग्नातले क्षण. लग्ना नंतरचे सुरुवातीचे क्षण. किती गोड असतात नाही!ते सगळे क्षण आपण कॅमेऱ्यात कैद करून ठेवतो, पुढे जाऊन पुन्हा पुन्हा बघण्यासाठी. पण इतक्या वर्षांच्या सहवासात, संसाराच्या सहजीवनात, काळाच्या, जबाबदाऱ्यांच्या ओघात, प्रेमाचे, संसाराच्या सुरुवातीचे क्षण बघण राहूनच जात.

म्हणून सुप्रिया यांनी शेअर केला पतीचा फोटोसुप्रिया पुढे लिहितात, "एक फोटो सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत करून टाकतो. पोटात पुन्हा तोच गोळा येतो. प्रेमाची फुलपाखर अवती भोवती घिरट्या घालू लागतात. बॅकग्राऊंडला ‘पेहेला नशा पेहेला खुमार’ चा piano ऐकू येतो आणि ओठांवर इतकंच येत, “पाहिले न मी तुला”. अशाप्रकारे सुप्रिया यांनी फोटो शेअर करत सुंदर पोस्ट लिहिली आहे. अभिनेता अंशुमन विचारेच्या आगामी पाहिले न मी तुला नाटकानिमित्ताने सुप्रिया यांनी ही पोस्ट शेअर केलीय.

टॅग्स :टेलिव्हिजनमराठीमराठी अभिनेता