बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये काल घरात टास्क झाला. या टास्कमध्ये अरबाज, निक्की, सूरज, छोटा पुढारी यांची एक टीम होती. तर दुसऱ्या टीममध्ये वैभव, धनंजय, अंकिता, आर्या हे स्पर्धक होते. यावेळी वैभवने दुसऱ्या टीमसोबत दगाफटका केल्याचं समजलं. वैभवने स्वतः बाथरुम एरियामध्ये याविषयी खुलासा केला. त्याने अरबाज-निक्कीशी बोलताना याविषयी सांगितलं. वैभवची हीच चूक बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धक सुरेखा कुडचींनी दाखवून राग व्यक्त केला.
सुरेखा कुडचींनी दाखवली वैभवची चूक
बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धक सुरेखा कुडची बिग बॉसच्या नवीन सीझनबद्दल टीकाटिप्पणी करताना दिसतात. सुरेखा यांनी काल वैभवने जो समोरच्या टीमला दगा दिला त्यावर बोट ठेवलंय. सुरेखा लिहितात, "वैरी ... आज बॉलचा टास्क झाल्यानंतर वैभव बाथरुम एरियामध्ये सांगत होता की त्याने पिशव्या आणि बॉल दिले शिवाय मुद्दाम पिशवीत कमी बॉल भरले .... क्या बात है वैभव ज्या टीम सोबत होतास त्यांनाच दगा दिलास .... बाकी आज बिग बॉसने सगळ्यांशी साधलेला संवाद मस्त होता.. मज्जा आली ... मालवणी पण भारी होती.."
वैभवने नेमकं काय केलं?
कालचा टास्क झाल्यावर वैभवने बाथरुम एरियामध्ये अरबाज आणि जान्हवीसोबत संवाद साधला. वैभव म्हणाला, "मी निक्कीला पिशव्या दिला, बॉल दिले. मी सुद्धा मुद्दाम पिशवीत कमी बॉल भरले." असं म्हणताच जान्हवीने आईच्या गावात म्हणत कपाळावर हात मारला. अशाप्रकारे वैभवने स्वतःच खुलासा केला. वैभव चव्हाणला ही 'गद्दारी' भोवणार का? रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर वैभवला कसं सुनावणार? हे उद्या पाहावं लागेल.