Join us

"आयुष्यात एक व्यक्ती आली होती पण...", पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाबाबत सुरेखा कुडचींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:15 IST

सुरेखा कुडची यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांचा नवरा कॅमेरामन होता. यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केलं नाही आणि एकटीनेच लेकीला सांभाळ केला.

मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची (Surekha Kudchi) मालिका, सिनेमांमधून नावारुपाला आल्या. 'नवरी मिळे नवऱ्याला', 'भाग्यलक्ष्मी', 'चंद्र आहे साक्षीला', 'देवयानी' अशा अनेक मालिकांमध्ये त्या दिसल्या. त्यांना अनेकदा आपण खलनायकी भूमिकेत पाहिलं आहे. त्यांची नजरच अशी आहे की समोरच्याला भीती वाटेल. सुरेखा कुडची आता पन्नाशीला आल्या आहेत. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पतीचं आजारपणामुळे निधन झालं. त्यांना एक मुलगी आहे जी आता दहावीला आहे. पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही का यावर नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

सुरेखा कुडची यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांचा नवरा कॅमेरामन होता. यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केलं नाही आणि एकटीनेच लेकीला सांभाळ केला. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "मला याबाबतीत विचार येण्यापेक्षा माझ्या कुटुंबानेच मला मुलगी लहान आहे तोपर्यंत दुसरं लग्न कर असा सल्ला दिला होता. माझी सासूही तयार होती. काहीच हरकच नाही माझा पूर्ण पाठिंबा आहे असं ती म्हणाली होती. मी त्यावेळी ३७ वर्षांची होते. पण त्यावेळी मी मानसिकरित्या तयार नव्हते. मला दुसरं लग्न करायचं नव्हतं."

त्या पुढे म्हणाल्या, "एक-दोन वर्षांनंतर माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली. मला ती व्यक्ती आवडली. आम्ही छान बोलायचो, भेटायचो. पण कुठेतरी असं वाटायला लागलं की बाईला पुरुष भेटतो पण मुलीला वडील भेटत नाही. फक्त माझ्यासाठी नाही पण माझ्या आयुष्यात येणारी व्यक्ती माझ्या मुलीचाही स्वीकार करेल का? असा प्रश्न पडायचा. नुसतंच रिलेशनशिप मला नको होतं. म्हणून मी ते तिथेच थांबवलं. त्यामुळे या भानगडीतच पडायला नको असं मी ठरवलं."

टॅग्स :मराठी अभिनेतालग्नपरिवारटिव्ही कलाकार