Join us

आमचं ठरलंय! स्वानंदीने प्रेमाची कबुली दिल्यावर अशी होती वडिलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 11:28 AM

Uday tikekar:स्वानंदी-आशिषविषयी कळताच उदय टिकेकरांनी दिली होती ही प्रतिक्रिया

छोट्या पडद्यावरील 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर (swanandi tikekar). काही दिवसांपूर्वीच स्वानंदीने आमचं ठरलंय असं म्हणत प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर तिने नुकतीच प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी (ashish kulkarni) याच्यासोबत साखरपुडा केला. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये तिची चर्चा रंगली आहे. स्वानंदीने जाहीरपणे तिच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर अनेक जण थक्क झाले होते. यामध्येच तिच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती? हा प्रश्न अनेकांना पडला होता. विशेष म्हणजे यात स्वानंदीच्या वडिलांनी म्हणजेच अभिनेता उदय टिकेकर (uday tikekar) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

स्वानंदीने आशिषसोबत एक फोटो शेअर करत त्यांचं नातं जाहीरपणे सांगितलं. त्यानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी तिच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडला. यामध्येच उदय टिकेकर यांनी केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

स्वानंदीची पोस्ट पाहिल्यावर उदय टिकेकरांनी त्यावर 'तुम्हाला माझा आशीर्वाद', असं म्हणत कमेंट केली. त्यांची ही कमेंट पाहून होणारा जावई आशिष कुलकर्णी यानेही लगेच रिप्लाय देत पुण्याला लवकर या काका असं म्हटलं. यावर उद्याच असं म्हणत उदय टिकेकरांनीही पुन्हा रिप्लाय दिला. 

दरम्यान, दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत स्वानंदीने मिनल ही भूमिका साकारली होती. तर अलिकडेच ती अस्सं माहेर नको गं बाई या मालिकेत दिसली होती. तसंच तिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई’ या मालिकांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :स्वानंदी टिकेकरटेलिव्हिजनउदय टिकेकर