Join us

पंजाबी कुडी! मराठमोळ्या स्वीटूचा पंजाबी लूक ठरतोय लक्षवेधी; पाहा अन्विताचा नवा ट्रेंडिंग व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 14:23 IST

Anvita phaltankar:अलिकडेच स्वीटूने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चक्क पंजाबी लूक केला आहे.

'येऊ कशी तशी ती नांदायला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर (anvita phaltankar).  या मालिकेत अन्विताने स्वीटू ही भूमिका साकारली आहे. समंजसपणा, आपुलकी, प्रेम अशा छटा अन्विता साकारत असलेल्या स्वीटूच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच या स्वभाव गुणांमुळे ही मालिका लोकप्रिय झाली. अन्विता कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असून अलिकडेच तिने एक नवा ट्रेंड फॉलो केला आहे.

अन्विता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती कायम नवनवीन ट्रेंड फॉलो करत असते. या ट्रेंड फॉलो करण्यामधूनच तिची नृत्याविषयी असलेली आवडही अनेकदा पाहायला मिळते. अलिकडेच स्वीटूने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चक्क पंजाबी लूक केला आहे.

स्वीटू म्हणजेच अन्विता कायम नवा ट्रेंड आला की तो वेगळ्या पद्धतीने फॉलो करायचा प्रयत्न करत असते. यावेळी तिने 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील 'दिवाना है देखो' या गाण्यावर रिल शेअर केलं आहे.

दरम्यान,  या गाण्यामध्ये हृतिक रोशन आणि करीना कपूर-खान ही जोडी झळकली आहे. मात्र, यावेळी स्वीटूने केलेल्या रिल्समुळे अनेकांना करीनाचाही विसर पडल्याचं दिसून येत आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनकरिना कपूर