अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) 'प्रेमाची गोष्ट' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ती पुन्हा छोट्या पडद्याकडे वळली आहे. तिची 'अग्गंबाई सासूबाई' मालिका चांगलीच गाजली होती. आता तिच्या नवीन मालिकेसाठी चाहते उत्सुक आहेत. शुभांगी गोखले, राज हंचनाळे आणि अपूर्वा नेमळेकर यांचीही मालिकेत मुख्य भूमिका आहे. मालिकेतील सहकलाकारांविषयी तेजश्रीने एका वाक्यात वर्णन केलं आहे. यावेळी अपूर्वा नेमळेकरबाबत तेजश्री नेमकं काय म्हणाली हे चर्चेत आहे.
अपूर्वा नेमळेकरची (Apurva Nemlekar) मालिकेत निगेटिव्ह भूमिका आहे. शुभांगी गोखलेसोबत तेजश्री दुसऱ्यांदा काम करत आहे. तिचं एका शब्दात वर्णन करताना तेजश्री म्हणाली, 'अभ्यासू'. तर सहकलाकार राज हंचनाळेबद्दल ती म्हणाली, 'कूल'. तेजश्री आणि अपूर्वा नेमळेकर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे अपूर्वाबद्दल तेजश्रीला विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, 'अपूर्वा आणि माझं अजून एकत्र काम सुरु झालं नाही. पण हॉट'.
दोन अभिनेत्री एकाच प्रोजेक्टमध्ये असतील तर त्यांचं जमत नाही असंच अनेकांना वाटतं. 'शेवंता' या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर बिग बॉसमध्ये रनर अप होती. तर आता ती 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. ऑनस्क्रीन दोघींमध्ये टशन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पडद्यामागे त्यांच्यात नेमकं कसं बाँडिंग होतं हे बघण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत. तेजश्रीने तर अपूर्वाचं 'हॉट' म्हणत कौतुक केलं आहे.