Join us

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेने केलं लीप फिलर; चेहरा बिघडल्यामुळे आता होतीये ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:37 IST

Shweta mahadik: श्वेताने इन्स्टाग्रामवर तिच्या लीप सर्जरीचे काही फोटो शेअर केले. मात्र, हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी फिट आणि परफेक्ट दिसण्यासाठी वेगवेगळ्या सर्जरी करुन घेत असतात. आतापर्यंत अनेक कलाकारांनी ओठांवर, नाकांवर सर्जरी करुन त्यांचा लूक बदलला आहेत. याच काहींची सर्जरी यशस्वी झाली तर काहींना चेहरा मात्र बदलला. यामध्येच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांच्या सुनेनीदेखील लीप फिलर सर्जरी केली. मात्र, या सर्जरीमुळे तिच्या ओठांचा आकार बदलला असून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उमा भेंडे यांच्या सुनेने म्हणजेच अभिनेत्री श्वेता महाडिक हिने नुकतीच लीप फिलर ही सर्जरी केली आहे. श्वेता हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु, सध्या तिने तिच्या लेकीच्या संगोपनासाठी  इंडस्ट्रीतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. परंतु, ती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह आहे. यामध्येच तिने एक फोटो शेअर करत लीप  फिलर केल्याचा फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली.

श्वेताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ती लीप फिलर करणार असल्याचं सांगितलं होतं. आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, तेवढीच उत्साही आणि चिंता पण वाटते. माझ्या चेहऱ्यावर काही फिलर्स करणार आहे. लवकरच तुमच्यासमोर येईन, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर तिने तिचा सर्जरीनंतरचा फोटो शेअर केला.

काय म्हणाले ट्रोलर्स?

'तू केलेलं लीप फिलर अजिबात चांगलं दिसत नाहीये', 'आधी तू छान दिसायचीस', 'हे सगळं करायची काय गरज होती',अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. इतंकच नाही तर काहींनी तिला सल्ले सुद्धा दिले आहेत.

सध्या काय करते श्वेता?

श्वेता महाडिकने सध्या कलाविश्वातून जरी ब्रेक घेतला असला तरीदेखील ती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर क्रिएटिव्ह आयडियाज शेअर करत असते. श्वेता महागड्या पर्स, इअर रिंग्ज, डिझायनर कपडे कमी खर्चात कसे तयार करता येतील याच्या आयडिया चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशस मीडियावर तिचे ८ लाख ८४ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार