प्रसिद्ध मराठी युट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (urmila nimbalkar) आजच्या घडीला साऱ्यांनाच ठावूक आहे. उर्मिला हिला कोणी ओळखत नाही असं म्हणणारा क्वचितच कोणी सापडले. युट्यूबवर आपला दबदबा निर्माण करणारी उर्मिला इन्स्टाग्रामवरही सक्रीय असून कायम नवनवीन व्हिडीओ घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत असते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
वर्षभरापूर्वी उर्मिलाने अथांग या गोड चिमुकल्याला जन्म दिला. अलिकडेच त्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे उर्मिलाप्रमाणेच तिचा लाडका लेकी लोकप्रिय स्टार किड ठरत आहे. त्यामुळे उर्मिला बऱ्याचदा या चिमुकल्यासोबतचे व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी तिने पालक झाल्यानंतर आपल्या आवडीनिवडींना कशी मुरड घालावी लागते हे मजेशीर अंदाजात सांगितलं आहे.
"आई-बाप झाल्यावर लईच सज्जन वागावं लागतं. चॅाकलेट- लाईम ज्युस मी खाल्लं, तर अथांग तेच मागणार म्हणून फक्त लाईम रंगाचा टॅाप मिळेल!", असं कॅप्शन देत उर्मिलाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये उर्मिला कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. त्यामुळे सध्या अनेक जण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तर, काहींनी तिचा फिटनेस फंडा जाणून घेण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.