सध्या लग्नसराई सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबेडीत अडकताना दिसत आहेत. काही लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. तूर्तास चर्चा आहे ती ‘कुसूम’ फेम अभिनेत्री वेदांगी कुलकर्णीच्या (Vedangi Kulkarni ) लग्नाची. होय, वेदांगी नुकतीच लग्नबेडीत अडकली. पेशवाई थाटात नुकताच हा विवाह सोहळा पार पडला. अभिषेक तिळगुळकर याच्यासोबत वेदांगीने लग्नाच्या आणाभाका घेतल्या.
वेदांगीच्या शाही लग्नाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नासोबतच प्री-वेडिंग फोटोशूट व संगीत सेरेमनीचे फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळताहेत. यावर्षी 9 मार्चला वेदांगी व अभिषेकचा साखरपुडा झाला होता. यानंतर गेल्या 20 नोव्हेंबरला दोघांचं लग्न पार पडलं. लग्नात वेदांगीने पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती तर अभिषेकने पेशवाई पोशाख केला होता.
स्टार प्रवाह वरील ‘साथ दे तू मला’ या मालिकेत ती प्राजक्ताच्या भूमिकेत दिसली होती. लंडनच्या आजीबाई, मऊ, छडा, लौट आओ गौरी, बिलिव्ह इन सारख्या नाटक या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आली. वेदांगी उत्तम नृत्यांगना असून डान्स महाराष्ट्र डान्स या रिअॅलिटी शोमध्येही ती चमकली होती.