Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत ठार करण्यात आले. संध्याकाळी अक्षयला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्याच वेळी आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळी झाडली. निलेश मोरेंच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, त्यात अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. या घटनेबाबत विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर मराठी अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर प्रकरणी विविध राजकीय पक्षांचे अनेक राजकारणी, नेतेमंडळी आपापल्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत. काहींनी एन्काउंटरच्या निमित्ताने सरकारला कोंडीत पकडण्याचेही प्रयत्न केलेत. तर काहींनी अक्षय शिंदे एन्काऊंटर झाल्याने पीडितेला न्याय मिळाला, असे म्हणत सरकारचे कौतुक केले आहे. याविषीय अनेक तर्कवितर्क लढवले जातील. अशातच मराठी अभिनेत्री विदिशा म्हसकरने (vidisha maskar) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांचं नागरिकांकडून होणाऱ्या कौतुकाची एक बातमी विदिशाने शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये तिने "खऱ्या आयुष्यातील सिंबा, सिंघम स्टोरी", असं म्हटलं.