Join us

विशाखा सुभेदारचा मुलगा पुढील शिक्षणासाठी निघाला परदेशात; पोस्ट शेअर करत अभिनेत्री झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 16:09 IST

विशाखा सुभेदारचा मुलगा त्याच्या पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाला आहे. 

Vishakha Subhedar post : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री विशाखा सुभेदारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. फेसबुक पोस्टच्या आधारे अभिनेत्रीने तिचा लाडका लेक परदेशात शिक्षणासाठी जात असल्याची माहिती दिली आहे. विशाखाच्या मुलाने शिष्यवृत्ती मिळवून लंडनमधील प्रतिष्ठित महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळवला आहे. अशातच अभिनेत्री तिच्या लाडक्या लेकाला निरोप देताना भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. 

विशाखाची लेकासाठी खास पोस्ट-

नुकतीच सोशल मीडियावर विशाखा सुभेदारने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहंलय, "आज आमचा अबू... अबुली पुढल्या शिक्षणासाठी लंडनला निघाला. तेथील 'एम.ए इन फिल्म मेकिंग; (spl direction) करायला प्लायमाउथ शहरात ! अबू, तू जी जी स्वप्न पाहिलीस तू पूर्ण होवो. अतिशय मेहनती आणि झोकून देऊन काम  पूर्ण करणारा आहेस तू..! आत्ता ही जायचं म्हटल्यावर त्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी तू सक्षमपणे पार पाडल्या आणि त्यासाठी नवी मुंबई, वाशी येथील 'wisdome career education' या मंडळीने आम्हाला मदत केली. जातीने ते लक्ष घालतात, त्यांचे ही खूप खूप आभार. तुझ्या मार्कलिस्ट वर वर्क एक्सपेरियन्समुळे आणि तुझ्या  इच्छाशक्तीने ही कमाल केली आहे. या पुढेही तू तिच मनीषा बाळग".

पुढे अभिनेत्रीने म्हटलंय,  "दुरदेशी तू माणसं जोडशीलच कारण तू अतिशय लाघवी गुणी स्वभावाचा आहेस. जां, अबुली जीं ले जिंदगी! खूप छान शिकून ये, तयारीचा गडी होऊनच ये. बाकी सगळं तुला तर माहितीय,सगळं काही तुझ्याचसाठी आहे. माझ्या समजूतदार हुशार बाळा. लव यू अबुली! आणि मी आणि बाबा तुला प्रचंड मिस करणार आहेत. पण आई बाबा तुझ्या स्वप्नांसाठी कायम तुझ्या पाठीशी उभे राहणार". 

टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडिया