गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सेलिब्रिटी घर, गाडी खरेदी करताना दिसत आहेत. गुढी पाडव्याचे औचित्य साधून गाथा नवनाथांची मालिकेतील अभिनेत्रीने लग्नागाठ बांधली आहे. ही अभिनेत्री म्हणजे रुही तारू (Ruhi Taru). तिने मंदार कामठेसोबत पुण्यात सातफेरे घेतले. रुहीने गाथा नवनाथांची या मालिकेत पार्वती मातेची भूमिका साकारली होती.
अभिनेत्री रुही तारूने ३० मार्च रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदार कामठेसोबत लग्नगाठ बांधली. तिने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिले की, तुम्ही बातमी ऐकली का? आम्ही लग्न केले आहे! नुकतंच लग्न केल्याची भावना. तिच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
वर्कफ्रंटरुही तारूने गाथा नवनाथांची मालिकेशिवाय बऱ्याच मालिकेत काम केले आहे. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ, प्रेमा तुझा रंग कसा, घेतला वसा टाकू नको अशा मालिकेत तिने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. याशिवाय मोरूची मावशी या गाजलेल्या नाटकात ती निशाची भूमिका साकारली होती. द ट्रकर- एक प्रवास या सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.