Join us  

ओ सजनी रे...! रोमँटिक गाण्यावर नारकर कपलचा व्हिडिओ, गप्पांमध्ये रमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 4:05 PM

ओ सजनी रे...' लापता लेडीज' सिनेमातलं गाणं सध्या सर्वांच्याच ओठांवर आहे.

ओ सजनी रे...' लापता लेडीज' सिनेमातलं गाणं सध्या सर्वांच्याच ओठांवर आहे. सिनेमा जितका सुंदर आहे तितकंच हे गाणंही खासही आहे. फूल आणि दीपक यांच्या नात्यावर हे छानसं गाणं आहे. अरिजीत सिंहने गायलेल्या या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ आहे. दरम्यान मराठमोळं कप अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या (Aishwarya Narkar) यांनाही गाण्याची भुरळ पडली आहे. दोघांचा गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल होतोय.

अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या दोघंही कायम उत्साहात असतात. रील्स करण्याचा तर त्यांना भलताच छंद लागला आहे. कोणत्याही व्हायरल रीलवर किंवा लोकप्रिय गाणी, डायलॉग्सवर या कपलचा व्हिडिओ असतो. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असून ते त्यांच्या व्हिडिओतूनही दिसतं. 'ओ सजनी रे...' गाण्यावर त्यांनीही छानसा व्हिडिओ केला आहे. अविनाश नारकर झोक्यावर आराम करत आहेत तर त्यांच्या डोक्यात नदीकिनारी बायकोसोबत घालवलेले क्षण, गप्पा आठवत आहेत. 'काय संवाद सुरु असेल आमचा अंदाज लावा' असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्या नारकर-अविनाश नारकर यांनी 'गंध निशिगंधाचा' नाटकात पहिल्यांदा एकत्र काम केलं. याचवेळी दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. अविनाश नारकर यांनी ऐश्वर्या यांना लग्नाची मागणी घेतली. 3 डिसेंबर 1995 साली ते लग्नबंधनात अडकले.

टॅग्स :अविनाश नारकरऐश्वर्या नारकरमराठी अभिनेतासोशल मीडिया