Join us  

हिंदीतील मराठमोळ्या ‘आई’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2016 12:15 PM

हिंदी सिनेमा असो किंवा छोट्या पडद्यावरील हिंदी मालिका यांत कायमच मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पडली आहे. संपन्न रंगभूमीचा ...

हिंदी सिनेमा असो किंवा छोट्या पडद्यावरील हिंदी मालिका यांत कायमच मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पडली आहे. संपन्न रंगभूमीचा अनुभव आणि अभिनय कौशल्य यामुळं या कलाकारांनी हिंदी सिनेमा आणि हिंदी मालिकांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यांत मराठमोळ्या अभिनेत्रीही मागे नाहीत. सध्या छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या मालिकांमध्ये मराठीतील दिग्गज अभिनेत्री आईची भूमिका साकारताना पाहायला मिळतायत.सुप्रिया पिळगांवकर – मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या सुप्रिया यांनी विविध हिंदी मालिकांमध्ये काम केलंय. सासू-सूनेच्या भांडणाची जुगलबंदी असलेली त्यांची ‘तू-तू-मैं-मैं’ ही हिंदी मालिका छोट्या पडद्यावर हिट ठरली होती.. आता त्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळतायत.. सध्या सोनी टीव्ही सुरु असलेल्या ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत सुप्रिया मालिकेचा नायक बिझनेसमन देव दीक्षितच्या आईची ईश्वरी ही भूमिका साकारताना पाहायला मिळतायत.गीतांजली टिळेकर – मराठमोळ्या अभिनेत्री गीतांजली टिळेकर यांनी याआधीही हिंदी मालिकेत काम केलं होतं. स्टार प्लस वाहिनीवरील ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेत त्यांच्या अभिनयाची झलक छोट्या पडद्यावरील रसिकांनी पाहिली होती. आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर त्या आल्यात आईच्या भूमिकेत. ‘इक दुजे के वास्ते’ या मालिकेत गीतांजली टिळेकर आईची भूमिका साकारतायत. या मालिकेतील प्रमुख पात्र असलेल्या श्रवण या नायकाच्या आईची भूमिका गीतांजली साकारतायत.निशिगंधा वाड – मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा आणि छोट्या पडद्यावरील आणखी एक गाजलेलं मराठमोळं नाव म्हणजे निशिगंधा वाड. आपल्या अभिनयानं त्यांनी रसिकांची मनं जिंकलीत.. सध्या ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील निशिगंधा वाड यांचा अभिनय रसिकांना भावतोय.. या मालिकेत त्या आईची भूमिका साकारतायत.शिल्पा तुळसकर – ‘देवकी’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘सनई चौघडे’ अशा विविध मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पडलेलं मराठमोळं नाव म्हणजे शिल्पा तुळसकर.. त्यांनी सिनेमासह छोटा पडदाही गाजवलाय.. विविध मराठी आणि हिंदी मालिकांमधला त्यांचा अभिनय रसिकांना भावलाय.. विविध भूमिकांचं आव्हान लीलया पेलणा-या शिल्पा तुळसकर आता ‘जाना ना दिल से दूर’ या मालिकेत आईची भूमिका साकारतायत.नीना कुलकर्णी – हिंदी, मराठी सिनेमा असो किंवा छोटा पडदा.. सगळ्याच रसिकांचं परिचयाचं नाव म्हणजे नीना कुलकर्णी.. आपल्या आजवरील अभिनय कारकिर्दीत नीना कुलकर्णी यांनी विविध भूमिकांचं आव्हान समर्थपणे पेललंय.. आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आईच्या भूमिकेत पाहायला मिळतायत. ‘ये है मोहब्बते’ या मालिकेत तमिळ महिलेची भूमिका साकारतायत.. आपल्या लेकीच्या लग्नाची आणि तिच्या सुखी संसाराची अनेक स्वप्न पाहिलेल्या आईच्या भूमिकेत त्या दिसतायत..