Join us

आई कुठे काय करते: अरुंधती- ईशामध्ये कडाक्याचं भांडण; संजनामुळे नव्या वादाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 11:33 IST

Aai kuthe kay karte: संजना घरात आल्यापासून सतत वादविवाद होताना दिसत आहेत. यात अनेकदा अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्यात मतभेद होत असल्याचं पाहायला मिळतं.

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ( aai kuthe kay karte) या मालिकेत आतापर्यंत देशमुखांच्या घरात आलेले अनेक चढउतार प्रेक्षकांनी पाहिले आहेत. संजना घरात आल्यापासून या घरात सतत वादविवाद होताना दिसत आहेत. आता तर अनिरुद्धदेखील संजनाची बाजू घेऊन घरातल्यांसोबत वाद घालताना दिसत आहे. यात अनेकदा अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्यात मतभेद होत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, आता संजनामुळे अरुंधती आणि ईशा या दोघींमध्ये कडाक्याचं भांडण होणार आहे.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ईशा आणि अरुंधती एकमेकींसोबत वाद घालताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मागे संजना कारणीभूत असल्याचं पाहायला मिळतंय.

ईशाने तिच्या काही मैत्रिणींना घरी जेवायचं आमंत्रण दिलं होतं. यावेळी अरुंधती या मुलींसाठी जेवणाचा बेत करणार होती. मात्र, ऐनवेळी तिला शक्य न झाल्यामुळे संजनाने बाहेरुन काही पदार्थ ऑर्डर केले. मात्र, संजनाने प्रमाणापेक्षा जास्त पदार्थ मागवल्यामुळे ते शिल्लक राहिले. तसंच इशाच्या मैत्रिणींनी काही पदार्थ ताटात तसेच टाकून दिले.  त्यामुळे अन्नाची झालेली नासाडी बघून अरुंधतीच्या संतापाचा पारा चढला आणि तिने इशा ओरडण्यास सुरुवात केली. इशाने दरवेळेप्रमाणे अरुंधतीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. 

दरम्यान, या वादात संजना आणि अनिरुद्ध यांनीही उडी घेतली. त्यामुळे या दोघींमधील वाद आता कुठपर्यंत जातो की पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार