Join us

'अनिरुद्ध आणि तू वेगळे व्हा'; अरुंधतीचा संजनाला थेट सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 12:00 IST

Aai kuthe kay karte: अरुंधती आता विचारांनी स्वतंत्र होण्यासोबतच तिचे निर्णय घेण्यास सक्षम झाली आहे. त्यामुळे ती प्रत्येक गोष्टींमध्ये तिचं मत ठामपणे मांडताना दिसते. तर, अनिरुद्ध मात्र, पुन्हा एकदा संसाराच्या कचाट्यात सापडला आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका सध्याच्या घडीला लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. त्यामुळे या मालिकेत नेमकं काय घडतं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाल्यानंतर दोघांनीही त्यांच्या स्वतंत्र वाटा निवडल्या आहेत. यात अरुंधती आता विचारांनी स्वतंत्र होण्यासोबतच तिचे निर्णय घेण्यास सक्षम झाली आहे. त्यामुळे ती प्रत्येक गोष्टींमध्ये तिचं मत ठामपणे मांडताना दिसते. तर, अनिरुद्ध मात्र, पुन्हा एकदा संसाराच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे आता त्याला संजनासोबत संसार करावा लागत आहे. परंतु, संजनाचे विचार आणि घरातल्यांचे विचार फारसे जुळत नसल्यामुळे दररोज घरात वाद होताना दिसतात. यामध्येच आता अरुंधती संजना आणि अनिरुद्धला वेगळं होण्याचा सल्ला देणार आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती आणि संजना यांच्यात शाब्दिक वाद होताना दिसत आहेत. इतकंच नाही तर अरुंधती, संजनावर काही आरोपही करणार आहे.

अरुंधतीने घराचे पेपर्स गहाण टाकल्यानंतर संजनाने घरात मोठा वाद करत अनिरुद्धला त्याच्या वाट्याचा हिस्सा विकायला सांगितला. ज्यावरुन अनिरुद्धने आई-आप्पांवर आरोप करत आपण स्वतंत्र होत असल्याचा निर्णय घेतला. यावरुनच अरुंधती आणि संजना भांडण करणार आहेत.

दरम्यान, 'तुला घरातल्यांसोबत जुळवून घेता येत नाही त्यामुळे तू आणि अनिरुद्ध वेगळे व्हा. इतरांना सुखात राहू दे', असा सल्ला अरुंधती संजनाला देतांना दिसत आहे. त्यामुळे आता अरुंधतीने दिलेला सल्ल्यावर संजना तिला कोणतं उत्तर देणार हे येत्या भागात प्रेक्षकांना कळणार आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार