'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट आला आहे. इशाला वाचवणाऱ्या यशवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे त्यामुळे संपूर्ण देशमुख कुटुंब सध्या चिंतेत आहे. यामध्येच यशला या प्रकरणातून सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी अरुंधती, आशुतोष आणि अनिरुद्ध शक्य होतील तितके प्रयत्न करत आहेत. यामध्येच आता त्यांना सोसायटीमधल्या लोकांची देखील साथ मिळणार आहे.
सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात वाईट काळात देशमुखांना सोसायटीमधील लोकांची साथ मिळणार आहे. सोसायटीमधले लोक देशमुखांना धीर देण्यासाठी त्यांच्या घरी येणार आहेत.
सोसायटीमधील लोक यश गुणी मुलगा आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उत्तार येत असतात. आम्ही सगळं तुमच्यासोबत आहोत काही लागलं तर नक्की कळवा. तर तुमच्या तिनही मुलांवर अरुंधतीचं संस्कार आहेत डोळ्यात तेलं घालून तिने तिनही मुलांना वाढवलंय. यश असे करु शकतच नाही अशा शब्दांत देशमुखांना धीर देतात.
दरम्यान, पिकनिकला गेलेल्या इशावर नीलने जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. जे पाहून रागाच्या भरात यशने त्याच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात नील जखमी झाला. परंतु, डोक्याला मार लागल्यानंतर अचानकपणे नील आणि त्याच्यासोबत असलेला स्टाफ एकाएकी गायब झाले. त्यामुळे या प्रकरणामागे नक्कीच नीलचा काही तरी हात असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच, या प्रकरणात यशला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सुलेखाताई त्याची मदत करणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत नेमकं काय घडतं?, यशवरील संकट दूर होईल का? नीलचं सत्य समोर येईल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.