'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे गौरी आणि जयदीप. कमी कालावधीत या दोघांनीही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या दोघांविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे ऑनस्क्रीन वावरणाऱ्या या जोडी ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना विशेष भावते. त्यामुळेच हे दोन्ही कलाकार कायम चाहत्यांच्या भेटीला येत असतात. अलिकडेच या दोघांनी त्यांच्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला असून चाहत्यांकडून त्याला पसंती मिळत आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत अभिनेता मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या दोघांनी अलिकडेच मालिकेच्या सेटवर धमाकेदार डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
'आधी अभ्यास करा आणि मग टीका'; NCB ला ट्रोल करणाऱ्यांना क्रांतीचं सडेतोड उत्तर
गिरिजा आणि मंदार या दोघांनी सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेहशहा' या चित्रपटातील गाण्यावर रोमॅण्टिक डान्स केला आहे. या दोघांनी Raataan Lambiyan या गाण्यावर डान्स केला आहे. त्यामुळे सध्या या दोघांचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
दरम्यान, स्टार प्रवाहवरील ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत गिरिजा आणि मंदारसह लोकप्रिय अभिनेत्री वर्षाव उसगांवकरदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत.