Join us

'प्रत्येक गोष्टीचा शेवट हा होतोच'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 14:44 IST

Marathi actress: छोट्या पडद्यावरील लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. सहकुटुंब सहपरिवार, लोकमान्य या गाजलेल्या मालिका नुकत्याच संपल्या आहेत. त्यानंतर आणखी एका लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका संपल्यानंतर त्यातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

छोट्या पडद्यावर गाजलेली 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका जवळपास २ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मात्र, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पार पडलं. याविषयी या मालिकेतील एका अभिनेत्रीने भावूक पोस्ट शेअर केली आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. या मालिकेत अक्षयाने लतिका ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. त्यामुळे आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतीये हे ऐकल्यावर चाहत्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

"#OneLastTime प्रत्येक गोष्टीचा शेवट हा होतोच. आमच्या लतिकाच्या गोष्टीचा शेवटदेखील जवळ आलाय, आणि तो नक्कीच गोड होणारे. आज लतिका - देवाच्या लग्नाचा भाग कसा वाटला तुम्हाला ? #GoodByeSundara",असं कॅप्शन देत अक्षयाने या मालिकेच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, या मालिकेच्या शेवटच्या भागात लतिका आणि देवा यांचं लग्न होताना दाखवणार आहेत. त्यामुळे या मालिकेचा शेवट गोड होणार आहे. 

टॅग्स :अक्षया नाईकसेलिब्रिटीटेलिव्हिजन