Join us

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे अपघाती निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 13:40 IST

कोल्हापुर सांगली महामार्गावरील हालोंडजवळ डंपरने दिलेल्या धडकेत कल्याणीचा मृत्यु झाला. या दुर्घटनेनंतर कलाक्षेत्रातील तिच्या अनेक सहकलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव हिचा कोल्हापुर येथे अपघाती मृत्यु झाला आहे. कोल्हापुर सांगली महामार्गावरील हालोंडजवळ डंपरने दिलेल्या धडकेत कल्याणीचा मृत्यु झाला. या दुर्घटनेनंतर कलाक्षेत्रातील तिच्या अनेक सहकलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

कल्याणी हिने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली होती. कल्याणी मुळची कोल्हापुरचीच होती. प्रेमाची भाकरी नावाने तिने स्वत:चे हॉटेल देखील सुरु केले होते. 

कोल्हापुर सांगली महामार्गावर यापुर्वीही अपघात झाले आहेत. मात्र प्रशासनाचे कायम याकडे दुर्लक्ष होत आहे. कल्याणीच्या निधनानंतर पुन्हा महामार्गाकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाअक्षया नाईकहार्दिक जोशी