‘नवा गडी नवं राज्य’ मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 07:15 PM2023-12-15T19:15:28+5:302023-12-15T19:21:05+5:30

‘नवा गडी नवं राज्य’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Marathi show 'Nava Gadi Nava Rajya' is set to go off-air on December 23, 2023 | ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

‘नवा गडी नवं राज्य’ मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

मराठी मालिका या घरोघरी मोठ्या आवडीने पाहिल्या जातात. मालिका पाहिल्याशिवाय काही घरात तर दिवस पूर्ण होत नाही. मराठी वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी सतत चढाओढ लागलेली पाहायला मिळते. त्यासाठी काही मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, टीआरपी घसरत गेल्यास मालिका बंद केल्या जातात. आता अशीच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

झी मराठीवर सध्या अनेक मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. यात काही मालिका लोकप्रिय ठरत आहेत. तर, काही मालिकांना उत्तम कथानक असूनही TRP मिळत नाहीये. आता ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग काही दिवसांपूर्वीचं झालं आहे. 23 डिसेंबरला मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती आहे. 

मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणाऱ्या वर्षा दांदळे यांनी इन्स्टाग्रामवरून चाहत्यांनी माहिती दिली. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.  पोस्टमध्ये मालिकेतील सर्व स्टारकास्ट दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहले,
'Finally आम्ही आता 23 dec पर्यंत तुमच्या प्रेमाचे साक्षीदार राहणार आहोत. खूप प्रेम दिलंत मित्रामैत्रिणींनो.. आभार नाही मानणार कारण आपलं हक्काचं.. जिव्हाळ्याच्या हक्काचं नातं आहे'.

नुकताच हार्दिक जोशीचा ‘जाऊ बाई गावात’ हा शो सुरू झाला. या मालिकेमुळे ‘चला हवा येऊ द्या’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘३६ गुणी जोडी’ यांच्या वेळेत बदल करण्यात आला. ‘नवा गडी नवं राज्य’विषयी बोलायचे तर, ही मालिका सध्या दुपारी २:३० वाजता टेलिकास्ट होत आहे. ही आगळावेगळ्या कथेची मालिका  गेल्यावर्षी ८ ऑगस्टला २०२२ ला सुरू झाली होती. 
 

Web Title: Marathi show 'Nava Gadi Nava Rajya' is set to go off-air on December 23, 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.