Utkarsh Shinde: औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादाला नागुरात हिंसक वळण लागलं आणि या वादाचं रूपांतर दंगलीत झालं. सोमवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमध्ये काही समाजकंटकांनी शेकडो गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे रस्त्यावर काचांचा आणि दगडांचा अक्षरशः ढीग पडला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी अजूनही या परिसरात भयाण शांतता आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटले असून विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय तसेच मनोरंजन विश्वातील कलाकार यावर व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच नागपुरात निर्माण झालेल्या या परिस्थितीनंतर मराठमोळा गायक उत्कर्ष शिंदेने खास पोस्ट शेअर केली आहे.
उत्कर्ष शिंदेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नागपुरमधील दंगल सदृश्य परिस्थितीवर भाष्य करणारी कविता पोस्ट केली आहे. ही कविता त्याने इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यामध्ये लिहिलंय...
उद्या यांची पोरं विदेशात असतीलदंगल करू नका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील...
ना शिक्षण,नोकरी,घर ना पैसा ना मान-सन्मानफक्त कोर्टाच्या पायऱ्या दिसतीलदंगल करू नका मित्रांनोतुमच्या नावावर फक्त केसेस असतील...
कसं होइल बहिणीचं लग्न - नरक होईल बायकोच जगणंकसं कराल आईच म्हातारपण- कसं कराल बापाच कार्यहाथ रिकामा खिसे रिकामे-खिशात दमडी नसतीलउद्या यांची पोर विदेशात असतीलदंगल करू नका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील...
जन्म जगण्यासाठी आहे राजकारण्यांच्या त्या वार्ता नकोतुम्हीच सांगा तुमच्या घराला पुरूष कोणी करता नको ?विचार करा भविष्याचा पिढ्या अंधारात बसतीलतुम्ही ठीक तर घरचे आनंदित तुमच्या नेहमी असतीलदंगल करू नका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील...
रीबीत रहा -स्वाभिमानाने जगा तर लोक तुम्हाला पुजतीलजाति भेद भाषा प्रांत याने होईल सारा अशांतसमाज कंटक बनून राहाल -पोलीस घरत घुसतीलकरावसं ही भोगल तुम्हीच -तेव्हा कोणीसोबत नसतीलउद्या यांची पोरं विदेशात असतील,दंगल करू नका मित्रांनो तुमच्या नवावर फक्त केसेस असतील...
दरम्यान, उत्कर्ष शिंदेने रचलेली ही कविता अनेकांना विचार करायला लावणारी आहे. सध्या त्याची ही पोस्ट सेशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत आपलं समर्थन दर्शवलं आहे.