Join us

शशांक केतकरचं स्वप्न साकार! दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली नवीकोरी गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 15:53 IST

शशांक केतकरने शेअर केला नव्या कोऱ्या गाडीबरोबरचा व्हिडीओ, चाहत्यांना दिली गुडन्यूज.

Shashank Ketkar : ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) घराघरात पोहोचला. नाटक, चित्रपट, मालिका, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतोय.  अभिनेता शशांक केतकरसोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. शशांक त्याच्या बेधडक,स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो . नुकताच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओद्वारे त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीचा शुभमुहूर्त साधत शशांकने नवीकोरी गाडी खरेदी केली आहे.

शशांक सोशल मीडियावरुन नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सबद्दल चाहत्यांना माहिती देत असतो. महागडी गाडी घेतल्याची गुडन्यूजही त्याने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्याने TATA NEXON.E.V ही नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. नव्या गाडीचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये शशांकच्या चेहऱ्यावर स्वप्नपूर्तीचा आनंद स्पष्ट दिसत आहे. 

शशांकचं वर्कफ्रंट

शशांक केतकरने 'होणार सून मी या घरची' मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. या मालिकेतील श्री-जान्हवीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या मालिकेनंतर शशांक 'हे मन बावरे' मालिकेत झळकला. सध्या शशांक स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेत झळकत आहे. या मालिकेतील रमा-अक्षय या जोडीने प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळवलंय. शशांकचंं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून त्याला मुलगाही आहे.

टॅग्स :शशांक केतकरदिवाळी 2024टिव्ही कलाकारसोशल मीडिया