Join us  

"यंदा आषाढी एकादशीला भारतात नाहीये,पण...", संकर्षणने अमेरिकेत केली विठ्ठल-रुक्मिणीची पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 1:20 PM

अनेक नाटक, मालिका तसेच मराठी चित्रपटांमधून काम करत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नावारुपाला आला .

Ashadhi Ekadashi 2024 : अनेक नाटक, मालिका तसेच मराठी चित्रपटांमधून काम करत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नावारुपाला आला . 'माझी तुझी रेशीम गाठ' तसेच 'आम्ही सारे खवय्ये' या मालिकांमधून तो लोकप्रिय झाला. उत्तम अभिनेत्याबरोबरच संकर्षण एक उत्तम कवी म्हणून देखील ओळखला जातो. सध्या संकर्षण 'ड्रामा ज्युनियर्स' या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे.  अलिकडेच सोशल मीडियावर संकर्षणने शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्याने काही फोटो इंटरनेटवर शेअर केल्याचे पाहायला मिळत आहेत. 

सध्या संकर्षण परदेशात त्याच्या नाटकांच्या प्रयोगामध्ये व्यस्त आहे. अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात त्यांच्या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. आज आषाढी एकादशीच्या दिवशी तो अमेरिकेत असल्याने या वर्षी आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घेता येणार नाही याची त्याला चिंता होती. पण अखेरीस त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. तिथल्या एका वारकरी मंडळाने चक्क अभिनेत्याला विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेचा मान दिला आहे. 

संकर्षण कऱ्हाडेने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हायरल पोस्टमध्ये त्यानं लिहलंय, " या वर्षीच्या आषाढी एकादशीला भारतात नाहीये…सारखं मनात वाटत होतं की “दर्शन कुठे घ्यावं… ??? उपवास कसा करावा ??? …” पण अमेरिकेत प्रयोग करायला आलो Austin मध्ये … आणि तिथल्या मंडळाने प्रयोग सुरु करायच्या आधी विचारलं की ;“आम्ही दर वर्षी पांडूरंगाची पूजा करतो , दिंडी आयोजित करतो… तर तुम्ही पुजेचा मान घ्याल का ….?” मला असं वाटलं की ,विठ्ठलानेच साद घातली". अभिनेत्याच्या या व्हायरल पोस्टने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. 

संकर्षण अत्यंत साधा असून तो प्रेक्षकांसमोरही तितक्याच साधेपणाने वावरतो. त्यामुळे लोकप्रिय अभिनेता असूनही तो कधीच त्याचा स्टारडम प्रेक्षकांसमोर दाखवत नाही. त्याच्या याच साधेपणामुळे तो चाहत्यांना आपलासा वाटतो.

टॅग्स :टेलिव्हिजनमराठी अभिनेताआषाढी एकादशी