Join us

"जीन्स पॅन्ट आणि टॉप वगैरे घालून...", महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं परखड मत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:15 PM

वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने तिचं रोखठोक मत मांडलं आहे.

Radhika Deshpande: 'आई कुठे काय करते' तसेच 'होणार सून मी या घरची' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री राधिका देशपांडे (Radhika Deshpande) नावारूपाला आली. राधिका देशपांडे ही उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच  दिग्दर्शिका देखील आहे. वेगवेगळ्या मालिका, नाटक तसेच चित्रपटांमधून राधिकाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर अभिनेत्री मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे पोस्टच्या माध्यमातून ती आपले मत परखडपणे मांडताना दिसते. दरम्यान, नुकतीच राधिका देशपांडेने एका मुलाखतीत महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर आपलं रोखठोक वक्तव्य केलं आहे.

अभिनेत्री राधिका देशपांडेने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीला महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मग असं म्हटलं जातं त्या अशा कपडे घालतात म्हणून तो अत्याचार झाला हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, " तुम्ही कुठले कपडे घालताय किंवा करत आहात त्यापेक्षा तुमची नजर कशी आहे तुमची दृष्टी कशी आहे हे महत्वाचं आहे. नुसती पुरुषांचीच नाही तर स्त्रीची पण. मी अनेकदा याचं निरीक्षण केलं आहे. मी अशा अनेक बायका पाहिल्यात ज्या साडी, कुंकू लावूनसुद्धा वेगळ्याच नजरेने पाहतात. तर काही बायका अगदी जीन्स पॅन्ट आणि टॉप वगैरे घालून त्या प्रोफेशनल वागत असतात". 

पुढे अभिनेत्री म्हणाली, "आपल्याला आपली सुरक्षा करता आली पाहिजे. मला असं वाटतं समोरच्या माणसाची हिंमतच नाही झाली पाहिजे. समोरचा माणूस हिंमत करतो कारण तो आपल्यापेक्षा जास्त बलवान असल्यामुळे करतो. म्हणून सेल्फ डिफेन्सचा कुठला ना कुठला प्रकार आपण शिकलाच पाहिजे. अशा पद्धतीने बायका तयार झाल्या पाहिजेत". असं परखड मत अभिनेत्रीने मांडलं. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीमहिला