Join us  

"मानधन द्यायची वेळ आल्यावर पैसे नाहीत सांगून...", अभिज्ञा भावेने सांगितलं पडद्यामागचं सत्य; म्हणते, ज्याचं हातावरचं पोट आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 11:52 AM

अभिज्ञा भावे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Abhidnya Bhave : अभिज्ञा भावे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्ष ती मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वातही अभिज्ञाने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सध्या ती 'बातें कुछ अनकहीं सी' या हिंदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अभिज्ञा सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असल्याची पाहायला मिळते. या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 

नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. कलाकारांचं मानधन वेळेवर मिळत नसल्याने त्यांना कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. यावरही तिने प्रकाश टाकला आहे. 

अभिज्ञा भावेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहलंय, "आता मालिकाविश्वातील धक्कादायक वास्तव समोर आणण्याची वेळ आली आहे. ते आम्हाला कमी मानधनात प्रोजेक्टमध्ये काम करावं अशी विनवणी करतात. वेळेत मानधन मिळेल असं आश्वानही देतात. त्यानंतर कित्येक महिने आशेवर ठेवतात. पुढे क्लाइंट किंवा इजन्सीमार्फत पैसे आले नाहीत, अशी  कारणं देत टाळाटाळ करतात". 

पुढे अभिनेत्रीने लिहलंय,"दरम्यान, एखादं काम वेळेत पूर्ण करण्याची ते आमच्याकडे मागणी करतात, त्यासाठी आमच्यावर प्रेशरही टाकलं जातं. पण, जेव्हा मानधन द्यायची वेळ येते तेव्हा ते शांत होतात. व्हॉट्सअ‍ॅप चॅट डिलीट केले जातात शिवाय कॉलही ब्लॉक केले जातात. असं करून ते फक्त मानधन देण्यातच उशीर करत नाहीत तर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा अनादर करतात, ज्यांचं हातावरचं पोट आहे. आम्हाला फुकटचं काहीही नको आम्हाला आमच्या मेहनतीचे पैसे हवेत. अशावेळेत जेव्हा वरिष्ठ माणूसच शांत बसतो तेव्हा पैशांची आर्थिक अडचण असणाऱ्यांना त्याचं खूप वाईट वाटतं".  

"आता तर काय नवीन पद्धत आली आहे, दोन दिवसांचं शूट २४ तासांमध्ये संपवलं जातं. तर काही वेळा हे शूट मध्यरात्रीपर्यंत केलं जातं. शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना नक्कीच याचा फायदा होतो, पण, वारंवार आम्हाला गृहित धरलं जातं. आम्हाला समाधानकार मानधन आणि सुरक्षित वातावरण आणि कामाचा आदर केला जाईल अशा प्रोडक्शन हाउसेसची गरज आहे". या पोस्टद्वारे अभिनेत्रीने सर्वांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं आहे. 

टॅग्स :अभिज्ञा भावेटिव्ही कलाकार