Join us

लाठीकाठी, तलवारबाजी अन्...;  छत्रपती शिवरायांच्या युद्धकलेचा वारसा जपणारी रणरागिणी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक 

By सुजित शिर्के | Updated: February 19, 2025 15:35 IST

अभिनेत्री पायल जाधवने शिवजयंती निमित्ताने शेअर केली खास पोस्ट.

Payal Jadhav: कलर्स मराठी वाहिनीवरील 'अबीर गुलाल या' मालिकेतून अभिनेत्री पायल जाधव (Payal Jadhav) घराघरात पोहोचली. या मालिकेत श्री नावाची व्यक्तिरेखा साकारून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. दरम्यान, 'अबीर गुलाल' मालिकेत पायल जाधव आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका होती. अगदी काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. परंतु सध्या पायल जाधव चर्चेत आली आहे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने (Shiv Jayanti 2025) अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अनेकाचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री शिवकालीन युद्धकलेची प्रात्याक्षिके करताना दिसते आहे. 

अभिनेत्री पायल जाधवने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे. नुकताच सोशल मीडियावर पायलने व्हिडीओ शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. शिवाय व्हिडीओमध्ये ती लाठीकाठी आणि तलवारबाजी करतानाची चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर करते आहे. पायलच्या या कौशल्य पाहून अनेक मराठी कलाकारांसह तिचे चाहतेदेखील भारावून गेले आहेत. सगळ्यांनीच तोंडभरुन केलं आहे. दरम्यान, पायलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।।"

पुढे अभिनेत्रीने लिहंलय की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोर कर्तुत्वाला नमन. शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत, प्रौढप्रतापपुरंदर अशा थोरल्या महाराजांकडून प्रेरणा घेत केलेला हा माझा छोटा प्रयत्न. हर हर महादेव!!" अशी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

वर्कफ्रंट

अभिनेत्री पायल जाधवच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 'अबीर गुलाल' मालिकेत दिसली होती. त्याचबरोबर 'बापल्योक' आणि 'थ्री ऑफ अस 'या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. 

टॅग्स :शिवजयंतीटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया