Join us

अभिनय की व्यवसाय? मृणाल दुसानिसची नवी इनिंग सुरू; व्हिडीओ शेअर करत दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:54 IST

मराठी मालिकांमधील लाडका चेहरा आणि कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस (Mrunal Dusanis).

Mrunal Dusanis : मराठी मालिकांमधील लाडका चेहरा आणि कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस (Mrunal Dusanis). अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारून मृणालने मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. गेल्या काही वर्षांपासून मृणाल सिनेसृष्टीपासून लांब होती. काही काळ तिने कामातून ब्रेक घेतला होता. लग्नानंतर पती आणि कुटुंबीयांबरोबर ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. अखेर चार वर्षांनी मृणाल पुन्हा भारतात परतली आहे. ती शेवटी आपल्याला 'हे मन बावरे' मालिकेत दिसली. अशातच मृणालने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

मृणालसह तिचा पती नीरज मोरे यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी इंटिरिअरचं काम चालू असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांणा उधाण आलं आहे. अलिकडेच अभिनेत्री मृणाल दुसानिस पुन्हा मालिकाविश्वात कमबॅक करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, अद्याप या मालिका आणि कथानकाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. अशातच तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे चाहते देखील संभ्रमात आहेत.या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मृणालने “लवकरच काहीतरी नवीन घेऊन येत आहोत. तुम्ही ओळखू शकता का नेमकं काय सुरु आहे?” असं लिहलंय. शिवाय या कॅप्शनबरोबर “लॉन्चिंग सून’, ‘नवीन उपक्रम’, ‘कमिंग सून’, ‘स्टे ट्यून” असे टॅग्जही तिने वापरल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता मृणाल नवीन व्यवसाय सुरु करणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

मृणालने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी', 'हे मन बावरे', 'अस्सं सासर सुरेख बाई' अशा मालिकांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

टॅग्स :मृणाल दुसानीसटिव्ही कलाकारसोशल मीडिया