Join us

Video : 'त्या नटीनं मारली मिठी...', रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईंसोबत भन्नाट डान्स; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 14:02 IST

छोट्या पडद्यावरील 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे.

Reshma Shinde Video: छोट्या पडद्यावरील 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) आणि अभिनेता सुमीत पुसावळे यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेने अल्पावधीच सर्वांची पसंती मिळवली आहे. जानकी व हृषिकेशची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. या मालिकेत सातत्याने नाट्यमय घडामोडी घडताना दिसतात. सध्या मालिकेत नानांचा मृत्यू झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. पण, हे सत्य नसून त्यांच्या अपहरणाचा कट रचून ऐश्वर्याने हा सगळा डाव रचला आहे. 

सध्या घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेचं कथानक रंजक वळणावर आहे. परंतु मालिकेतील कलाकार त्यांच्या शूटिंगच्या व्यग्र वेळेतून थोडा वेळ काढत कायम धमाल करत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच मालिकेत जानकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदेने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, यामध्ये अभिनेत्री तिच्या ऑनस्क्रीन जाऊबाईबरोबर म्हणजेच अवंतिकासोबत डान्स करताना पाहायला मिळत आहे.

जानकी आणि अवंतिकाने त्या नटीनं मारली मिठी या ट्रेंडिंग गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. "खूप व्यस्त शूटिंग शेड्यूल जिथे बोलायला, झोपायला किंवा श्वास घ्यायलाही वेळ नाही पण.. रीलसाठी..." असं कॅप्शन देत रेश्मा शिंदेने हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते आणि मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी लाईक्स आणि कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं आहे. 

वर्कफ्रंट 

दरम्यान, रेश्मा शिंदेनेही याआधी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. रेश्माने 'लगोरी', 'चाहूल', 'नांदा सौख्य भरे' या मालिकांमध्ये काम केलं आहे. काही मराठी सिनेमांमध्येही ती झळकली आहे.

टॅग्स :रेश्मा शिंदेटिव्ही कलाकारसोशल मीडिया