Shitaal Kshirsagar: अभिनेत्री शीतल क्षीरसागर हा (Shitaal Kshirsaagar) मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. छोट्या पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारुन ती लोकप्रिय झाली. 'माझी तुझी रेशीमगाठ', 'रमा राघव' तसंच 'का रे दुरावा' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. दरम्यान, अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिला अभिनय क्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवांविषयी सांगितलं.
नुकतीच अभिनेत्री शीतल क्षीरसागरने 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एका चाहत्याचा किस्सा शेअर केला. त्याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, "मी 'का रे दुरावा' मालिका करत होते. तोपर्यंत मालिका हे फक्त महिलांचं क्षेत्र आहे, असा एक समज होताच आजही आहे. पण 'का रे दुरावा' मालिका करताना मल पहिल्यांदा एक अनुभव आला. तेव्हा कोकणात एक कपल चाललं होतं आणि त्या नवऱ्याने त्याच्या बायकोला सांगितलं की अगं ही ती आहे. एका पुरुषाने आपल्याला ओळखल्याचं मला खरंच आश्चर्य वाटलं. त्याच्यामुळे आपली मालिका बहुधा प्रेक्षक बघत आहेत, याची खात्री पटली.
पुढे तिने सांगितलं, "पण जसं-जशी ती मालिका लोकप्रिय व्हायला लागली, आणि माझ्या पात्राला प्रतिसाद मिळत गेला. त्यानंतर हळुहळू मला पुरुष प्रेक्षकांकडून तुम्ही मराठी इंडस्ट्रीचे प्राण आहात अशी प्रतिक्रिया येऊ लागली. ती मला आवडली. तुम्ही जर नायिका होऊ शकत नसाल तर खलनायिका व्हायला काय हरकत आहे." असं किस्सा अभिनेत्रीने सांगितला.