Join us

शिवानी सोनारच्या आईला पाहिलंत का? वाढदिवशी अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली- "आमचा लाडोबा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 10:40 IST

अभिनेत्री शिवानी सोनारने तिच्या आईला वाढदिवसानिमित्त खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

Shivani Sonar: 'राजा राणीचं गं जोडी', 'सिंधुताई माझी माई' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) घराघरात पोहोचली. दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात आपलं हक्काचं स्थान मिळवलं. सध्या शिवानी सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध भावेसोबत मुख्य भूमिकेत काम करताना दिसते आहे. दरम्यान, नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या आईच्या वाढदिवशी खास पोस्ट केली आहे. 

शिवानी सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. शिवानीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आईच्या वाढदिवसानिमित्त तिला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये मायलेकींचा बॉण्ड पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

"आमचा लाडोबा आज ५० वर्षांचा झाला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आई! पुढे शिवानीने लिहलंय,मी कितीही चिडचिड करत असले तरी माझं तुझ्यावर आणि तुझ्यातल्या वेडेपणावर खुप प्रेम आहे. अशीच वेडी रहा. प्रत्येक जन्मात हिच आई मिळावी ह्यासाठी पुजा केली पाहिजे. नाही का? "असं कॅप्शन देत शिवानीने आईसोबतचे काही खास फोटो मीडियावर पोस्ट केले आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडियाव्हायरल फोटोज्