Join us

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील कलाकारांची सक्सेस पार्टीत धमाल; शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:20 IST

छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.

Sukh Mhanje nakki kay Asta : छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. पण, त्यातील काही मोजक्याच मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात. त्यामध्ये 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेचं नाव आवर्जुन घेतलं जाईल. गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अभिनेत्री गिरीजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर, वर्षा उसगांवकर अशी तगडी स्टाककास्ट या मालिकेत पाहायला मिळाली. मालिकेतील जयदीप- गौरीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अलिकडेच स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका ऑफ एयर झाली आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील दु: खी झाले आहेत. दरम्यान, ही मालिका संपल्यानंतर कलाकारांनी रियुनियन करत जंगी सेलिब्रेशन केलं आहे.

नुकतेच अभिनेत्री गिरीजा प्रभूने सोशल मीडियावर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका संपल्यानंतर सक्सेस पार्टीचं नियोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये मालिकेतील प्रत्येक कलाकाराने हजेरी लावली. शिवाय या सक्सेस पार्टीत ते धमाल करताना दिसत आहेत. "साडेवर्षांचे सोनेरी क्षण.." असं कॅप्शन देते गिरीजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या सक्सेस पार्टीत अभिनेते महेश कोठारे देखील सहभागी झाले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर गिरीजाने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टवर गिरीजाच्या एका चाहत्याने कमेंट करत म्हटलंय, "मालिका बंद झाली म्हणून आम्ही sad feel करतो..." तर आणखी एका यूजरने लिहिलंय, सगळे खूप सुंदर दिसताय."

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया