Join us

'तुला शिकवीन चांगला धडा'फेम अभिनेत्याने ठेवलं लेकीचं युनिक नाव; पहिल्यांदाच दाखवली बाळाची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 15:39 IST

Hrishikesh Shelar: या बारश्याला सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती.

अलिकडेच छोट्या पडद्यावर तुला 'शिकवीन चांगला धडा' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शिवानी रांगोळे (shivani rangole) आणि ऋषिकेश शेलार (Hrishikesh Shelar) ही जोडी मुख्य भूमिकेत झळकत आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेली ही मालिका सध्या प्रेक्षक आवडीने पाहात आहेत. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी आता चाहते प्रयत्न करु लागले आहेत. यामध्येच सध्या मालिकेतील अधिपतीची म्हणजेच अभिनेता ऋषिकेश शेलारची चर्चा रंगली आहे. अलिकडेच ऋषिकेशने त्याच्या लेकीचं थाटात बारसं केलं.

'तुला शिकवीन चांगला धडा' या मालिकेपूर्वी सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत झळकलेल्या ऋषिकेशला काही महिन्यांपूर्वीच कन्यारत्न झालं. त्यानंतर त्याने मोठ्या धुमधडाक्यात लेकीचं बारसं केलं. या बारश्याला मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती. 

अभिनेत्री अक्षया नाईकने इन्स्टाग्रामवर ऋषिकेशच्या लेकीच्या बारश्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या बारश्याला 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे ऋषिकेशने त्याच्या लेकीचं नावही सुरेख ठेवलं आहे. ऋषिकेशच्या लेकीचं नाव रुही असं ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेपूर्वी ऋषिकेशने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दौलत ही भूमिका साकारली होती. १३ जानेवारी रोजी ऋषिकेशने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याला मुलगी झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन