Join us  

Video: स्वीटू अन् शकुलाही पडली पुष्पाची भुरळ; 'श्रीवल्ली'वर केला अफलातून डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 4:57 PM

Anvita phaltankar: सोशल मीडियावर सक्रीय असणारी स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकर अनेकदा ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स करत असते. यावेळी तिने 'श्रीवल्ली' या गाण्यावर व्हिडीओ केला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर 'पुष्पा' (Pushpa: the Rise) हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम अशा विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील 'श्रीवल्ली' आणि 'बलम सामे' ही दोन गाणी चांगलीच लोकप्रिय झाली. आतापर्यंत या गाण्यावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी रिल्स, व्हिडीओ केले आहेत. इतकंच नाही तर  आता येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील स्वीटू आणि शकू यांच्यावरही या गाण्याची क्रेझ चढली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणारी स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकर अनेकदा ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स करत असते. यावेळी तिने 'श्रीवल्ली' या गाण्यावर व्हिडीओ केला आहे. विशेष म्हणजे यावेळी तिला शकूने म्हणजेच अभिनेत्री किशोरी अंबियेनेदेखील साथ दिली.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये दोघीही त्यांच्याच अंदाजात डान्स करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनसेलिब्रिटीTollywoodटेलिव्हिजन