Join us

'माझी तुझी रेशीमगाठ' नंतर परी झळकणार नव्या भूमिकेत; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 11:46 IST

Myra vaikul: माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून मायरा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तुफान लोकप्रिय झाली.

परी या एकाच नावाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी चिमुकली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील निरागस भाव यांच्यामुळे मायरा अल्पावधीत प्रेक्षकांची लाडकी झाली आहे.  'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून मायरा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तुफान लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे या मालिकेनंतर मायरा लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मायराच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मायरा लवकरच एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कोलिवूड प्रोडक्शन प्रस्तुत 'आई' या नव्या गाण्यात ती झळकणार आहे.  अलिकडेच या गाण्याचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आले.

Video: निरागसतेमुळे परीने जिंकलं नेटकऱ्यांचं मनं; पाहा शूटिंगच्या गडबडीतील मायराची मस्ती

या गाण्यामध्ये मायराने एका शाळकरी मुलीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे ती शाळेच्या गणवेशात दिसत आहे. 'आई विना मला करमत नाही', असे म्हणत मायरा आता 'आई' या गाण्यातून प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे या गाण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. 

दरम्यान, हे गाणं गायिका दिया वाडकर हिने गायलं आहे. यापूर्वी दियाने माझा बाप्पा किती गोड दिसतो हे गाणं गायलं होतं. तर, या गाण्याला प्रविण कोळी यांनी संगीत दिलं आहे. यापूर्वी प्रविण यांनी गोव्याच्या किनाऱ्यावर, सण आयलाय गो, आमचा मोरया रे, इश्काची नौका, चिंतामणी माझा, माझा बाप्पा, गोल्डीची हळद, माझा पिल्लू अशी प्रवीण कोळी अशी गाणी संगीतबद्ध केली आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिनेमासंगीत