Join us

Video: खंडेरायाच्या चरणी अक्षया-हार्दिक लीन; जेजुरी गडाचं घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 15:04 IST

Akshaya deodhar: अक्षया-हार्दिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी. काही काळापूर्वीच लग्नगाठ बांधलेली ही जोडी त्यांची मॅरीड लाइफ एन्जॉय करत आहेत. लग्नानंतर ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच या दोघांनी जेजुरी गडाचं दर्शन घेतलं. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी खंडेरायच्या चरणी लीन झाल्याचं दिसून येत आहे.

राजश्री मराठीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर अक्षया-हार्दिकचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी जेजुरी गडाचं दर्शन घेत आहेत. त्यांच्यासोबत यावेळी कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार दिसून येत आहे.  यावेळी या दोघांनी भंडारा उधळला, तळी आरती केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवर ही जोडी प्रेमात पडली. आणि, त्यानंतर या दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. सध्या अक्षया कोणत्याही मालिकेत दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. तर, हार्दिक सन मराठीवरील सुंदरी या मालिकेत दिसत आहे. 

टॅग्स :हार्दिक जोशीअक्षया देवधरसेलिब्रिटीटेलिव्हिजन