Join us

'अरुंधती' आणि 'डॉ. अजितकुमार'चं आहे खास नातं; दोघांमधील 'हे' कनेक्शन ऐकल्यावर व्हाल आश्चर्यचकित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 10:43 AM

Marathi tv serial: 'आई कुठे काय करते' आणि 'देवमाणूस' या दोन्ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाल्या आहेत. वि

छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, या मालिकांच्या गर्दीत अशा काही मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यातल्याच दोन मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) आणि 'देवमाणूस' (devmanus) या दोन्ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाल्या आहेत. विशेष म्हणजे या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अरुंधती आणि डॉ. अजितकुमार यांचं खास नातं असल्याचं समोर आलं आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar) ही अरुंधतीची भूमिका साकारत आहेत. तर, अभिनेता किरण गायकवाड (kiran gaikwad)  'देवमाणूस'मध्ये डॉ. अजितकुमार या भूमिकेत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे किरण आणि मधुराणी यांच्यात एक नातं असून फार मोजक्या जणांना ते ठावूक आहे.

काय आहे अरुंधती- डॉ. अजितकुमारचं नात?

अरुंधती म्हणजेच मधुराणी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक प्रशिक्षकदेखील आहे. मधुराणी आणि तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांची मिरॅकल्स अॅक्टींग ही अॅकॅडमी चालवतात. त्यांच्या या अॅकॅडमीमध्ये आतापर्यंत अनेक नवोदित कलाकारांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे किरण गायकवाड. हो. देवमाणूसमधील अजितकुमार हा मधुराणी यांचा विद्यार्थी आहे. याच संस्थेत त्याने अभिनयाचे धडे गिरवले आहेत.

'या' कलाकारांनी मधुराणीकडून गिरवलेत अभिनयाचे धडे

मधुराणीच्या संस्थेमधून आतापर्यंत हृता दुर्गुळे, गिरिजा प्रभू, शिवानी बावकर, किरण गायकवाड, निखिल चव्हाण या कलाकारांनी अभिनय शिकला आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका'देवमाणूस २' मालिकाकिरण गायकवाडसेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन