Join us

घर विकण्याच्या निर्णयावर अनिरुद्ध ठाम; आई-आप्पांवर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 17:15 IST

Aai kuthe kay karte: अविनाशसाठी आप्पा आणि अरुंधतीने घर गहाण ठेवल्यामुळे संजना आणि अनिरुद्ध यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला आहे.

ठळक मुद्देअविनाशला त्याच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अरुंधती आणि आप्पा त्यांचं राहतं घर गहाण ठेवतात.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या अनेक वादविवाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अविनाशसाठी आप्पा आणि अरुंधतीने घर गहाण ठेवल्यामुळे संजना आणि अनिरुद्ध यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे लहान लहान कारणं शोधून ते दोघंही अरुंधतीसोबत वाद घालताना दिसत आहेत. यामध्येच आता संजनाच्या सांगण्यावरुन अनिरुद्ध घराचे दोन भाग करणार आहे. विशेष म्हणजे आता त्याने त्याच्या हिश्शाचं घर विकण्याचा निर्णय घेतला असून त्यावर तो ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. 

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर 'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्ध, आई-आप्पांना त्याच्या वाट्याचा भाग विकणार असल्याचं सांगताना दिसत आहे. इतकंच नाही तर आता तुम्हाला माझी गरज नाही. प्रत्येक वेळी तुम्ही अरुंधतीचीच बाजू घेता असा आरोपही त्याने केला आहे. त्यामुळे आता ही मालिका अजूनच रंगतदार वळणावर येऊन पोहोचली आहे.

'माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही'; अरुंधतीने दिली अनिरुद्धला समज

दरम्यान, अविनाशला त्याच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अरुंधती आणि आप्पा त्यांचं राहतं घर गहाण ठेवतात. ही गोष्ट संजनामुळे घरातल्या अन्य सदस्यांना समजते. त्यामुळे सध्या देशमुख कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. इतकंच नाही तर अरुंधतीला टार्गेट करत तिला घरातून हकलून देण्यासाठी संजनाच्या हातात आयतं कोलीत सापडलं आहे. त्यामुळे आता अनिरुद्ध खरंच त्याच्या वाट्याचं घर विकणार का? की अरुंधतीच यातून मार्ग काढेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार