Join us

Video: 'मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे'; स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालं अरुंधतीचं पहिलं गाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 4:00 PM

Aai kuthe kay karte: सध्या अरुंधतीच्या आयुष्यात अनेक नवनवीन वळणं येत आहेत. या प्रत्येक वळणावर ती स्वत:ला सिद्ध करतानाही दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेने लोकप्रियतेच्या बाबतीत एक वेगळीच उंची गाठली आहे. आजवर छोट्या पडद्यावर असंख्य मालिका आल्या. परंतु, आई कुठे काय करते या मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे आजही मालिका लोकप्रियतेच्या यादीत पहिल्या स्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. सध्या अरुंधतीच्या आयुष्यात अनेक नवनवीन वळणं येत आहेत. या प्रत्येक वळणावर ती स्वत:ला सिद्ध करतानाही दिसत आहे. यामध्येच आता अरुंधतीचं पहिलं गाणं रेकॉर्ड झालं असून त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड करताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा मित्र आशुतोषदेखील असल्याचं दिसून येत आहे.  'मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपूर से सुखाचे चांदणे...' असे बोल असलेलं गाणं अरुंधती गातांना दिसत आहे.

दरम्यान, या मालिकेत अरुंधती आता एक एक करत मैलाचा टप्पा गाठत आहे. एकीकडे अनिरुद्ध तिच्या यशामुळे नाराज असल्याचं दिसून येत आहे. परंतु, अरुंधती त्याच्याकडे जराही लक्ष न देता स्वत:ला सिद्ध करत आहे. त्यामुळे ही मालिका सध्या रंगतदार वळणावर असल्याचं पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकासेलिब्रिटीटेलिव्हिजन