Join us

अरुंधतीला मिळालं तिच्या मनासारखं घर; देशमुखांच्या नाकावर टिच्चू करणार नव्या घरात गृहप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:14 IST

Aai kuthe kay karte: अलिकडेच अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं आहे. त्यामुळे ती तिच्या नव्या वाटचालीसाठी पुढे सरसावली आहे. यामध्येच आता ती अनिरुद्ध आणि संजना, कांचन यांच्या नाकावर टिच्चून नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या अनेक मालिकांपैकी एक असलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. या मालिकेत दररोज दाखवण्यात येत असलेल्या ट्विस्टमुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे. अलिकडेच अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं आहे. त्यामुळे ती तिच्या नव्या वाटचालीसाठी पुढे सरसावली आहे. यामध्येच आता ती अनिरुद्ध आणि संजना, कांचन यांच्या नाकावर टिच्चून नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे.

देशमुखांचं घर सोडल्यानंतर अरुंधती तिच्या आईकडे डोंबिवलीला शिफ्ट झाली होती. मात्र, आईवरही ओझं नको म्हणून ती तिच्या ऑफिसच्याच बाजूला कुठे तरी भाड्याने घर घेण्याचा विचार करते. या दृष्टीने ती नवीन घरं शोधण्यासही सुरुवात करते. अखेर आशुतोषच्या मदतीने तिला एक छानसं घर मिळतं. 

संजना-अरुंधतीला विसरा! अनिरुद्धच्या रिअल लाइफ पत्नीला एकदा पाहाच

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधतीला भाड्याने नवीन घर मिळाल्याचं दिसून येतं. इतकंच नाही तर मी घटस्फोटीत असल्याचंही अरुंधती घराचा करार करण्यापूर्वी सांगते. विशेष म्हणजे तिच्या वैयक्तिक जीवनाचा आणि घर भाड्याने देण्याचा काहीही संबंध नसल्याचं म्हणत घर मालक तिला आनंदाने घर देतात. त्यामुळे आता देशमुखांच्या नाकावर टिच्चून अरुंधती या नव्या घरात प्रवेश करणार आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारटेलिव्हिजन