Join us

अप्पीच्या डोहाळ जेवणात रुपाली घालणार गोंधळ; कदमांच्या घरात पुन्हा वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 4:28 PM

Appi amchi collector: रुपालीच्या कटकटीमुळे आप्पीच्या डोहाळ जेवणाला लागणार गालबोट?

छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'आप्पी आमची कलेक्टर' (appi amchi collector). या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवायला सुरुवात केली आहे. अर्जून आणि अपर्णा यांच्या नात्यात, त्यांच्या संसारात अनेक चढउतार आले. त्यामुळे या मालिकेत दाखवण्यात येणारा प्रत्येक ट्रॅक प्रेक्षकांना खिळवून ठेवत होता. त्यामध्येच आता अपर्णासोबत रुपालीदेखील आई होणार आहे. मात्र, रुपालीला आई होण्याची चाहूल लागल्यापासून तिचा स्वभाव चांगलाच बदलला आहे. त्यामुळेच आता अपर्णाच्या डोहाळ जेवणातही ती गोंधळ घालणार आहे.

अपर्णा पाठोपाठ रुपालीनेही आई होण्याची गोड बातमी दिली आहे. लग्नाला १०-१२ वर्ष झाल्यानंतर रुपाली आई होणार असल्यामुळे ती सतत तिच्या बाळाचा विचार करत आहे. मात्र, बाळाचा विचार करण्यासोबतच ती अपर्णासोबतही तिची सातत्याने तुलना करत आहे. इतकंच नाही तर आता अपर्णाच्या डोहाळ जेवणातही ती गोंधळ करणार असून या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात विघ्न आणणार आहे.

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत लवकरच अपर्णाचं डोहाळजेवण केलं जाणार आहे.  मात्र, अपर्णासोबत सतत तुलना करणारी रुपाली माझंही अपर्णासोबत डोहाळजेवण करा, असा हट्ट करुन बसते. विशेष म्हणजे रुपालीच्या डोक्यात हा विषय मनी मावशी भरवते त्यामुळे रुपाली हट्टाला पेटते.

अपर्णाला सातवा महिना लागल्यामुळे घरातला प्रत्येक जण तिच्या डोहाळ जेवणाची तयारी करु लागला आहे. मात्र, रुपालीदेखील गरोदर असल्यामुळे या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. परिणामी, तिला आणि स्वप्नीलला दोघांनाही घरी थांबावं लागतं. मात्र, रुपालीला घरी बसवून बाकीचे सगळे कसे आप्पीचे लाड करतायेत असं सांगून मनी मावशी रुपालीचे कान भरते. ज्यामुळे रुपाली माझंही डोहाळ जेवण करा अशा हट्टाला पेटते. 

दरम्यान, आता रुपालीमुळे आप्पीच्या डोहाळ जेवणात नवीन संकंट उभं राहिलं आहे. त्यामुळे आप्पीचं डोहाळ जेवण होणार का? रुपाली तिचा हट्ट मागे घेईल का? यातून कदम कुटुंबीय कसा मार्ग काढतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार